Ad will apear here
Next
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे
बाळ माने यांचे नव्या विद्यार्थ्यांना आवाहन


रत्नागिरी :
‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’ असे आवाहन रत्नागिरीतील ‘दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड एमआरआय’चे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले.

बीएस्सी नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. नर्सिंग कॉलेजमध्ये भविष्यात वसतिगृह, हायजिनिक फूड, योगा, व्यायाम या सुविधाही देण्याचा मानस आणि नर्सिंगचे सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचा संकल्प माने यांनी या वेळी व्यक्त केला.



ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदीसह आणखीही भाषा शिकल्या पाहिजेत. आपले नर्सिंगचे क्षेत्र माणसाच्या जीवन-मरणाशी संबंध असलेले आहे. सकारात्मक वृत्ती, आत्मविश्वास, रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा देणारे संभाषणकौशल्य हवे. हे असे क्षेत्र आहे, की शिक्षण झाल्यावर तत्काळ नोकरी मिळते. हा एकप्रकारे भविष्यनिर्वाहाचा अभ्यासक्रम आहे. देशात नर्सिंगला मोठे महत्त्व आहे. टेक्नोसॅव्ही व्हायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन उपकरणे येत आहेत. बेसिक, अॅडव्हान्स शिक्षणासह टेलिमेडिसीनच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे. आपल्या कामावर कोणत्याही कारणाचा विपरीत परिणाम होता कामा नये. रुग्णाच्या नातेवाइकांना आपण आश्वस्त केले पाहिजे.’

रजिस्ट्रार शलाका लाड यांनी सांगितले, ‘माने यांच्यामुळेच नर्सिंगचे शिक्षण येथे बऱ्याच विद्यार्थ्यांना घेता येऊ लागले. या शैक्षणिक संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे. इमारत होण्यापूर्वी पाच खोल्यांमध्ये कामकाज चालायचे. १४ वर्षांत सुमारे हजार विद्यार्थी शिकले.’

या वेळी सर्व नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतगायन, स्किटचे सादरीकरण केले. तसेच चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZIVCH
Similar Posts
कोकणातील ‘टॅलेंट’ झळकले; नऊ जणींची कॉग्निझंट, इन्फोसिसमध्ये निवड रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नऊ मुलींची कॉग्निझंट आणि इन्फोसिस या नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. बीसीए कॉलेजसह पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते
रत्नागिरीत एक डिसेंबरला वंध्यत्वासंदर्भात मोफत तपासणी शिबिर रत्नागिरी : रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अँड रिसर्च सेंटरच्या वतीने एक डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत धन्वंतरी रुग्णालयात वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये झाली पहिली राष्ट्रीय आभासी परिषद; जैवविविधतेबद्दल चर्चा रत्नागिरी : करोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ शकत नसल्याने, ऑनलाइन साधनांचा कल्पक वापर वाढला आहे. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पर्यावरणदिनानिमित्ताने ‘जैवविविधता आणि शाश्वत विकास’ या विषयावर दोन दिवसांची ऑनलाइन राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारची
प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी ते गोवा सायकलवारी; १० जणांची ‘कोकण भरारी’ रत्नागिरी : रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत सायकलने यशस्वीरीत्या पार करून रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम नुकतीच पार पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language